अमेरिकेत वाढतंय आत्महत्येचं प्रमाण

अमेरिका, १ ऑक्टोबर, २०२२ : सध्या आत्महत्येचे प्रमाण केवळ देशातच नवे तर जगभरात वाढले आहे. याला अमेरिकादेखील अपवाद नाही. सध्या अमेरिकेतही आत्मह्त्येचे प्रमाण वाढले आहे. हा आकडा ४६,००० वरुन आता ४७,६५० वर गेला आहे. अमेरिकेतल्या CDC अर्थात सेंट्रल डिसिज आणि प्रिवेंन्शन असोसिएशने हे आकडे जारी केले.

दर एक लाख लोकांमागे मागच्या चौदा वर्षात मृत्यू दर १३.५ होता. त्यात आता भर पडली आहे. १५ ते २४ वर्षाच्या मुलांच्या मृत्यूचा यात समावेश आहे. त्याआधी हा दर आठ टक्के होता. १९९० च्या काळात मृत्यूदराचे प्रमाण कमी होते,

कोविडच्या काळात आणि नंतर हा मृत्यूदर आठ टक्क्यावरुन वाढून १३.५ आणि आता तो १४ टक्क्यावर आला आहे.
हा दर कमी करण्यासाठी वैद्यकिय सेवा, तसेच समुपदेशन जास्त प्रमाणात उपलब्ध केले असल्याचे अमेरिकन फाऊंडेशन ऑफ सुसाईडचे प्रमुख जील हार्कवे यांनी सांगितलं. २०१८ ते २०२० काळात अमेरिकेतल्या या मृत्यू दरात घट झाली होती. पण कोविडनंतर वाढत्या दरामुळे अमेरिकेत चिंता व्यक्त केली जात आहे.

नोकरी नसल्यामुळे, वैवाहिक कलह आणि तरुणांचे स्वप्न भंग ही प्रमुख कारणे समोर आली आहेत. त्यातही तरुणांचे मृत्यू हे कोविड काळात जास्त प्रमाणात झाले आहेत. कोविड काळात कौटुंबिक कलह जरी वाढले तरी कुटूंब एकत्र आल्याने हे प्रमाण कमी झाल्याचे जील हॉर्केवे यांनी सांगितले.

आत्महत्या आणि तरुण पिढी हे समीकरण कुठेतरी आता पुसून टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा हा एक गंभीर विषय होऊ शकतो. हे मात्र सत्य स्वीकारावं लागेलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा