उस्मानाबाद ८ ऑगस्ट २०२० :उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर शहरात वेताळनगर या भागात राहणारा गणेश कृष्णा जगदाळे वय वर्ष ३८ या व्यक्ती ने आज दिनांक ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास राहत असलेल्या घरातच साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. तरी, संबंधित व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. बार्शी तालुक्यातील गौडगाव मध्ये राहणारे संबंधित व्यक्तीचे सासरे आमरुषी संकपाळ यांनी पोलीस ठाणे, तुळजापूर येथे दिलेल्या खबरेवरून संबंधित व्यक्तीच्या अकस्मात मृत्यू ची येथील पोलीस ठाण्यात नोंद केली गेली आहे.
संबंधित मृत व्यक्तीवर येथील घाटशीळ स्मशान भूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार केले आहेत. या प्रकरणात आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड













































