सुखविंदर सुखू असतील हिमाचलचे नवे मुख्यमंत्री, तर मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री

हिमाचल प्रदेश, ११ डिसेंबर २०२२: हिमाचल प्रदेशला नवा मुख्यमंत्री मिळालाय. काँग्रेस हायकमांडनं सुखविंदर सिंग सखू यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच प्रतिभा सिंह यांचे समर्थक आमदार मुकेश अग्निहोत्री यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलाय. रविवारी सकाळी ११ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते सायंकाळी ७ वाजता राज्यपालांची भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील.

हायकमांडचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचं प्रतिभा सिंह म्हणाल्या. त्याचवेळी सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितलं की, मी पुढील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार आहे. व्यवस्था बदलण्यासाठी ते सत्तेत आले आहेत. हिमाचलला सुंदर, स्वच्छ आणि प्रामाणिक राज्य बनवू. सुखविंदर खूपच भावूक दिसत होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सहभागी असलेल्या प्रतिभा सिंह यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीदरम्यान त्यांनी विधानसभेबाहेर घोषणाबाजी केली. त्याआधी हे लोक एका हॉटेलबाहेरही पोहोचले, जिथं केंद्र पर्यवेक्षक दावेदारांची बैठक घेत होते. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुखविंदर सिंग सुखू, प्रतिभा सिंग, मुकेश अग्निहोत्री, विक्रमादित्य सिंग, पर्यवेक्षक भूपेश बघेल, भूपेंद्र सिंग हुडा, प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला हेही विधानसभेत पोहोचले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा