सुलेमानीवर हल्ल्यासाठी वापरलेले ड्रोन खरेदीसाठी भारत प्रयत्नशील

नवी दिल्ली : इराणचा सैन्य कमांडर कासिम सुलेमानी यांच्यावर हल्ल्यासाठी जे ड्रोन म्हणजे मानवरहित विमान एमक्यू ९ रिपर वापरले गेले होते तशी ड्रोन खरेदीसाठी भारत प्रयत्नशील आहे. त्या संदर्भात बोलणी सुरु झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. मानवरहित विमान प्रकारातील ही ड्रोन सर्वात खतरनाक, वेगवान आणि अचूक निशाणा साधणारी म्हणून ओळखली जातात. या ड्रोनचा सर्वप्रथम वापर २०१५ साली सिरीयात आयएसआयएसचा दहशतवादी मोहम्मद ईवाजी उर्फ जिहादी जॉन याला ठार करण्यासाठी केला गेला होता.

याबाबत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, भारताने नुकतीच अमेरिकेसोबत अब्जावधी डॉलर्स किमतीची सुरक्षा उपकरणे खरेदीसाठी बोलणी केल्याचा एक अहवाल नुकताचसमोर आला आहे. त्यानुसार या खरेदीची बोलणी दीर्घकाळ सुरु आहेत आणि भारताच्या तिन्ही दलांसाठी मानवरहित विमाने (युएव्ही) खरेदीचा त्यात समावेश आहे.

भारतीय हवाई दलाला सप्टेंबर २०१९ मध्ये २२ अपाचे हेलीकॉप्टरचा पहिला ताफा मिळाला आहे.
रिपर ड्रोन ही युएव्ही प्रकारात मोडतात. जनरल अॅटोमिक एरोनॉटिकल सिस्टीमने ही ड्रोन विकसित केली आहेत. ६६ फुट लांब पंख असलेले हे ड्रोन ताशी ४८२ किमीच्या वेगाने उडू शकते आणि आकाशातून खालील हालचालींवर काटेखोर पाळत ठेऊ शकते. शोध आणि बचाव कार्यात सुद्धा त्याचा उपयोग करता येतो. भारत २०१६ पासून या ड्रोनच्या खरेदीसाठी प्रयत्न करत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा