नवी दिल्ली, २२ जून २०२० : सुप्रीम कोर्ट कडून भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेला मंजूरी मिळाल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आनंद व्यक्त करत म्हटले की, “आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खास करून ओडिशा मधील आमच्या बंधू भगिनींसाठी आणि विशेष करून भगवान जगन्नाथांच्या भक्ततांसाठी खप शुभ दिवस आहे. रथयात्रेला सुप्रीम कोर्टा कडून मंजूरी मिळाल्याने संपूर्ण देशात उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. जय जगन्नाथ!”
हि माझ्या सहित देशभरातील करोडो श्रद्धाळूंसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्धाळुंच्या भावनांना समजून घेवून तात्काळ सकारात्मक मार्ग काढण्यास प्रयत्न सुरू केले , ज्यामुळे आमची ही महान परंपरा कायम राहिली.
काल संध्याकाळी प्रधानमंत्रीच्या संगण्यावरून गजपती महाराज (पुरी के राजा) आणि पुरीचे शंकराचार्य यांच्याशी बोलणे करून त्यांचे यात्रेबाबतचे मत जाणून घेतले व त्याप्रमाणे प्रधानमंत्रीना याबाबत कल्पना दिली .
सकाळी प्रधानमंत्रींच्या सांगण्यानुसार सॉलिसिटर जनरल यांच्याबरोबर बोलणी झाली.घटनेचे महत्व व गांभीर्य लक्षात घेवून सुप्रीम कोर्टच्या व्हेकेशन बेंच समोर हा विषय ठेवण्यात आला. दुुपार नंतर यावर सुनावणी होवून सुखद व समाधानकारक निर्णय समोर आला.
या निकालाच्या धर्तीवर अमित शाह यांनी ओडिशातील तमाम लोकांना व करोडो श्रध्दाळूंना खुप खुप शुभेच्छा दिल्या, जय जगन्नाथ.
न्यूज अनकट प्रतिनिधी