नवी दिल्ली, 25 एप्रिल 2022: उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि लखीमपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी आशिष मिश्रा याने लखीमपूरच्या कनिष्ठ न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर लखीमपूर पोलिसांनी आशिष मिश्रा याची तुरुंगात रवानगी केली आहे. आशिष मिश्रा मोनूला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आशिष मिश्राला जामीन मिळाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचा मुलगा आणि लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष मिश्रा याने रविवारीच आत्मसमर्पण केले. सीजेएमच्या कोर्टात पोहोचल्यानंतर आशिष मिश्रा याने आत्मसमर्पण केल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राला अलाहाबाद हायकोर्टातून दिलेला जामीन रद्द करताना कठोर टिप्पणी केली होती. सुप्रीम कोर्टाने आशिषचा जामीन रद्द केला आणि त्याला सात दिवसांत आत्मसमर्पण करण्यास सांगितले. आशिष मिश्रा याला आत्मसमर्पण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सात दिवसांची मुदत आज म्हणजेच 25 एप्रिल रोजी पूर्ण होत होती.
25 एप्रिल हा सोमवार आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोर्टात खूप गर्दी असते. अशा परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी आशिष मिश्रा याने रविवारीच लखीमपूरच्या कनिष्ठ न्यायालयात आत्मसमर्पण केल्याचे मानले जात आहे. आशिष हा लखीमपूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे