सर्वोच्च न्यायालयात दोन न्यायमूर्तींच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली, १३ जुलै २०२३ : तेलंगण उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया तसेच केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस व्ही भट्टी यांची, सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मंजूरी दिली आहे. न्यायमूर्ती भुईया यांचा कार्यकाळ २ ऑगस्ट २०२९ पर्यंत तर न्यायमूर्ती भट्टी यांचा कार्यकाळ ६ मे २०२७ पर्यंत असेल, असे सांगण्यात आले आहे.

वरील दोन्ही न्यायमूर्तींच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची एकूण संख्या ३२ वर गेली आहे. या नियुक्त्यांनतरही न्यायालयातील न्यायमूर्तींची दोन पदे रिक्त आहेत. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील कॉलिजियमने गत ५ जुलै रोजी न्यायमूर्ती भुईया व न्यायमूर्ती भट्टी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदासाठी शिफारस केली होती.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची वाढलेली संख्या लक्षात घेता, या न्यायालयात प्रलंबित असलेली हजारो प्रकरणे सुनावणीस येण्याची शक्यता वाढली आहे. अजुन रिक्त असलेली २ पदे लवकरात लवकर भरली जावीत अशी आशा प्रलंबित केसेस असणाऱ्या लोकांची आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा