भ्रष्टाचार प्रकरणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

नवी दिल्ली, ३१ जुलै २०२३ : सर्वोच्च न्यायालयाने आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने डिके शिवकुमार यांच्याविरोधातील सीबीआय तपासाला अंतरीम स्थगिती दिली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला दिला.

१० फेब्रुवारी रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी डिके शिवकुमार यांच्याविरुद्ध सीबीआयच्या तपासावर अंतरिम स्थगिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. सीबीआयच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. डिके शिवकुमार यांच्यावतीने जेष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी सर्वोच्च न्यायालयात हजर झाले.

उच्च न्यायालयाच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही आणि सीबीआयची इच्छा असेल तर उच्च न्यायालयाला विनंती करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. २०१७ मध्ये आयकर विभागाने डिके शिवकुमार यांच्या घरांवर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. याप्रकरणी ईडीनेही शिवकुमार विरोधात चौकशी सुरू केली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा