छातीला स्पर्श करणे, पायजम्याची नाडी तोडणे ;उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य की अयोग्य आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

22
Supreme Court reviews Allahabad High Court decision
छातीला स्पर्श करणे, पायजम्याची नाडी तोडणे ;उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य की अयोग्य आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Supreme Court reviews Allahabad High Court decision: १७ मार्च रोजी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सगळीकडे वादग्रस्त ठरला. या वादग्रस्त ठरलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने माहिती घेत सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे . एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या खटक्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात पीडितेच्या स्तनांना हात लावणे, तिच्या पायजम्याची नाडी तोडणे आणि पीडितेला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेशा नाहीत, असे न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा म्हणाले होते.

मिश्रा यांनी दिलेल्या निर्णयावर वादाच्या चक्रात अडकला आहे. केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्यासह अनेकांनी मिश्रा यांनी दिलेल्या निर्णयावर नाराजी आणि टिप्पणी व्यक्त केली होती. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई व न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह याप्रकरणी बुधवारी (२६ मार्च) सुनावणी करणार आहेत. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य की अयोग्य याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

नेमक प्रकरणं काय ?

उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे धक्कादायक प्रकार घडला होता. दोन आरोपींनी एका ११ वर्षीय मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तिच्या छातीला स्पर्श केला, तिच्या पायजम्याची नाडी तोडली, तसेच तिला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा