राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींची सुटका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर २०२२ : सर्वोच्च न्यायालयानं माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याप्रकरणावर आज मोठा निकाल दिला आहे. निलनी आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा जणांच्या सुटकेचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठानं तुरुंगात दोन्ही दोषींची वागणूक समाधानकारक असल्याचं सांगितलं. ते बराच काळ तुरुंगात होते. हे लक्षात घेऊन त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची सुटका करण्याचा आदेश दिला.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशामुळे राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस हे मुक्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणातील दोषी पेरारिवलनला १८ मे रोजी सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनीही याच निकालाचा हवाला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी केली होती. नलिनी आणि रविचंद्रन या दोघांनी ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. कलम १४२चा वापर करून न्यायमूर्ती एल नागेश्वर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

तामिळनाडुत एका प्रचार सभेवेळी २१ मे १९९१ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात राजीव गांधी यांचा जागीच मृत्यू झाला होता. तपासानंतर सात जण या प्रकऱणी दोषी आढळले होते. टाडा कोर्टाने आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा दयेचा अर्ज स्वीकारत फाशीची शिक्षा रद्द केली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा