गोध्रा जळीत कांडातील दोषींना जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट २०२३ : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी २००२ मधील गोध्रा जळीत कांडातील दोषींना जामीन देण्यास नकार दिला. अब्दुल रहमान धंतिया, अब्दुल सत्तार इब्राहीम गद्दी आणि शौकत हे तीन दोषी आरोपी या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. ही घटना अत्यंत गंभीर होती. हे कुठल्या एका व्यक्तीच्या मृत्यूचे प्रकरण नाही, असे मत नोंदवत न्यायालयाने दोषींच्या याचिकेवर सुनावणीसाठी खंठपीठ स्थापन करु, असे स्पष्ट केले.

ज्यांनी जळत्या रेल्वेवर पेट्रोल टाकण्यासारखी विशिष्ट भूमिका बजावली होती. आणि ज्यांची मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. त्यांना जामीन दिला जाणार नाही हे आधीच स्पष्ट केले होते, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. तिघांविरोधात विशिष्ट आरोप असून हे प्रकरण अत्यंत गंभीर असे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावेळी १२ पैकी ८ दोषींना जामीन दिला होता. एका आरोपींच्या पत्नीला कर्करोग असल्याने न्यायालयाने त्यांच्या अंतरीम जामिनाची मुदत वाढविली होती. २००२ मध्ये गोधरात साबरमती एक्सप्रेस रेल्वेच्या डब्याला आग लावून ५९ जणांना जिवंत जाळण्यात आले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा