नुपूर शर्माला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

नवी दिल्ली ९ सप्टेंबर २०२२ : प्रेषित पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. नुपूर शर्मा यांच्या अटकेचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टानं शुक्रवारी नकार दिला आहे.

नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीची बोलताना प्रेषित मोहम्मद याच्या बद्दल वादग्रस्त विधान करत मुस्लीम समाजाच्या भावना दुखवतील असं विधान केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणावर गदारोळ माजला होता. इस्लामिक देशांनी याप्रकरणी भारत देशाने माफी मागावी अशी मोहिम देखिल सुरु केली होती. या दरम्यान त्याच वेळी भाजपकडून पक्षाच्या प्रवक्त्या असलेल्या नुपूर शर्मा यांच्या विधानाच भारतीय जनता पक्ष पूर्णपणे निषेध करतो असं स्पष्टीकरण देत त्यांना तात्काळ निलंबित केलं होतं.

या दरम्यान, नुपूर शर्मांच्या या विधानामुळं देशभरात काही टार्गेट किलिंगच्याही घटना घडल्या. नुपूर शर्मांच्या वायरल झालेल्या व्हिडिओच पोस्टचं समर्थन करणाऱ्या काही हिंदू व्यक्तींना टार्गेट करत मुलतत्ववाद्यांकडून त्यांच्या हत्या करण्यात आल्या. यामध्ये राजस्थानातील उदयपूर इथं आणि महाराष्ट्रातील अमरावती इथं उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा