१६ आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली, १४ जुलै २०२३ : शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्यात विधानसभा अध्यक्ष विलंब करत आहेत. त्यामुळे त्यांना या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना काही सूचना देणार आहेत काय? १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय तातडीने घेण्याबाबत आदेश देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सुनील प्रभू यांचे वकील आज कोर्टात युक्तीवाद करणार आहेत. सुनील प्रभू यांची याचिका ऐकून घ्यायची की विधानसभा अध्यक्षांना नोटीस द्यायची? हे कोर्ट आज ठरवणार आहे. मुख्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड,न्या. नरसिम्हा आणि न्या. मिश्ना यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेत १६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय द्यावा. दोन महिने उलटूनही विधानसभा अध्यक्षांकडून निर्णयाबाबत हालचाली होत नसल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीला जाणीपूर्वक उशीर करत असल्याचा याचिकेत आरोप. सुप्रीम कोर्टाच्या निकालात मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचाही या याचिकेत उल्लेख आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा