भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न, सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट

पुणे, २४ ऑगस्ट २०२३ : देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची येत्या ३० ऑगस्ट आणि १ सप्टेबरला बैठक होणार आहे. पण या बैठकीच्या सहा दिवसआधी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत मोठं विधान केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांना काहीही करून सत्तेत यायचं असतं, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. विशेष म्हणजे यावेळी सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट झाली नसल्याचा दावा केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपने यापूर्वीही दोनदा प्रयोग केला आहे. पण, आधी दोन वेळेस त्यांना यश आले नाही. पण, तिसऱ्या वेळी त्यांनी तगडी रणनिती आखली आणि अजित पवार त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतील बंड, अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचे कारण, पक्षाचे भवितव्य, कायदेशीर लढाई आणि पवार कुटुंबाविषयी महत्त्वाची मते व्यक्त केली आहे.

भाजपने तीनवेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, असा मोठा गोप्यस्फोट केला. त्यावर माध्यमांसी बोलताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. अनेकवेळा राष्ट्रवादीला फोडण्याचे प्रयत्न झाले. पण त्यांना अपयश आलं.यावेळी मात्र भाजपला ते शक्य झालं. त्यांना काहीही करुन सत्तेत यायचं आहे. साम दाम दंड भेद असं स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे. आमचा पक्ष अजून एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सतेत्त आहे. तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरात ही बैठक झाली. ही गुप्त भेट असल्याचं बोललं गेलं. त्यावर आम्ही गुप्त बैठक करत नाही. चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

अजित पवार यांचा निर्णय निराशाजनक आहेच. पण, संवाद साधणे हा परत येण्याचा मार्ग असू शकत नाही आणि ते परत येतील का? यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. पण मला विश्वास आहे की, आमच्या बाजूने आम्ही कुटुंब एकत्र ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. राजकारण घरात न आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अधिकारानुसार त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय लढाई आम्ही आमच्या नात्यात का आणावी? ही तर वैचारिक लढाई आहे. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोतच; पण आमच्यात वैचारिक लढाई सुरूच राहील. आगामी लोकसभा निवडणुकीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला कल्पना आहे की, माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातही आव्हाने निर्माण केली जातील. भाजप नेते, मंत्री दर १५ दिवसांनी मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. ते आले तरी काही हरकत नाही. त्यांना स्पर्धा करू द्या. शेवटी निर्णय जनता घेणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा