Supriya Sule : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील मंत्र्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी निशाणा साधत असताना त्या मंत्र्याच नाव घेतलेल नाही. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ” राज्यातील एक मंत्री बायकोच्या आड लपतात आणि बायकोच्या आडून बोलतात. डरपोक मंत्री कोण आहेत हे लवकरच महाराष्ट्राला कळेल. चार-सहा महिन्यांत त्यांचीच विकेट पडणार आहे, त्यांचे नाव आत्ताच जाहीर करून चालणार नाही.”असे गंभीर विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
आज पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हास्त्रीय बैठक पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या. तेव्हा त्या बोलत होत्या. आगामी काळातील पक्षाची वाटचाल आणि निवडणूक यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री हवर्धन पाटील,आमदार शशिकांत शिंदे, बापू पठारे याचबरोबर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यासह पक्षाचे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटासह धनंजय मुंडेवर सुद्धा जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, बरे झाले पक्ष फुटला. जो दोन मुले असलेल्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवु शकतो, अशा फालतू माणसांसोबत काम करणे शक्य नाही.अशा तीव्र शब्दात निशाणा साधला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर