प्रक्षोभक घोषणाबाजी प्रकरणाचा आरोपी पिंकी चौधरीचे सरेंडर

नवी दिल्ली, १ सप्टेंबर २०२१: देशाची राजधानी दिल्ली मधील जंतर-मंतर वर  द्वेष निर्माण करणाऱ्या घोषणा केल्यामुळे फरार असलेल्या भूपेंदर तोमर उर्फ पिंकी चौधरी ने मंगळवारी पोलिसांसमोर सरेंडर केलं. पिंकी चौधरी मंगळवारी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस स्टेशन मध्ये शेकडो समर्थकांसह पोहोचला. पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्यावर समर्थकांनी हार घालून त्याचे स्वागत केले. आता या प्रकरणी दिल्ली पोलिस त्याला अटक करतील.
यापूर्वी सोमवारीच पिंकी चौधरीने सरेंडर करण्याबाबत बोलले होते. पिंकी चौधरीने न्यायालयावर आपला विश्वास असल्याचा दावा करत मी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही असे म्हटले होते. पिंकी ने असे अनेक वेळा विधान केले आहे की त्यानी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही.
खरं तर, ८ ऑगस्ट रोजी जंतर -मंतर येथे एका कार्यक्रमादरम्यान अल्पसंख्याक समुदायाविरोधात प्रक्षोभक घोषणा देण्यात आल्या.  यामध्ये हिंदू रक्षा दलाचा नेता पिंकी चौधरी देखील उपस्थित होता.  या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी वकील अश्विनी उपाध्याय यांना अटकही केली होती.  घोषणाबाजीच्या वेळी अश्विनी तिथे उपस्थित होता.  मात्र, नंतर त्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला.
 या प्रकरणी विनोद शर्मा, दीपक सिंग, दीपक, विनीत क्रांती, प्रीत सिंह यांनाही अटक करण्यात आली.  तिथेच, पिंकी चौधरी या घटनेपासून फरार झाला होता. आतापर्यंतच्या तपासात हे समोर आले आहे की पिंकी चौधरीवर नोएडा आणि गाझियाबादमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
 गेल्या आठवड्यातच दिल्लीच्या न्यायालयाने पिंकी चौधरीचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.  सुनावणीदरम्यान दंडाधिकारी अनिल अंतिल म्हणाले होते, ‘आम्ही तालिबानच्या अधिपत्याखाली नाही.  कायदा देखील काहीतरी आहे आणि आपला समाज चालवण्याचे पवित्र तत्व आहे. जंतर -मंतरवरील त्याचे वक्तव्य ‘प्रक्षोभक’ आणि ‘धमकी देणारे’ असल्याचेही न्यायालयाने मान्य केले होते.  हे वक्तव्य समाजात ‘द्वेष’ आणि ‘द्वेषभावना’ला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आले आहे, हेही न्यायालयाने मान्य केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा