सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली, दि. १७ जून २०२०: सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात नवे वळण आले आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी बरेच जण काही सेलिब्रिटींना दोष देत आहेत. यामुळे अ‍ॅडव्होकेट सुधीरकुमार ओझा यांनी बॉलिवूडमधील ४ मोठ्या सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

या प्रकरणात करण जोहर, संजय लीला भन्साळी, सलमान खान, एकता कपूर आणि सुशांतच्या आत्महत्येशी संबंधित अन्य ४ जणांचा समावेश आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. एएनआयच्या ट्विटनुसार, आयपीसीच्या कलम ३०६, १०९, ५०४ आणि ५०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत वकील सुधीरकुमार ओझा म्हणाले – माझ्या तक्रारीत असे म्हटले आहे की सुशांतसिंग राजपूत यांना जवळपास ७ चित्रपटातून काढून टाकले गेले. त्याचे इतर काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. सुशांतच्या सभोवताली अशा परिस्थिती निर्माण झाल्या की त्याला आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास भाग पडले.

या खटल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर एकता कपूरची प्रतिक्रिया आली आहे. तिने इंस्टावरील पोस्टमध्ये लिहिले – ‘सुशी (सुशांत सिंग) ला कास्ट न केल्याने गुन्हा नोंदविल्याबद्दल धन्यवाद. परंतू त्याला या क्षेत्रात आणणारी तर मीच होते. सुशांतच्या मृत्यूवर लावल्या जाणाऱ्या या अंदाजाबद्दल मी नाराज आहे. अशा प्रकारच्या अंदाज लावून सुशांतच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये वेगळे वातावरण निर्माण करू नका, कृपया त्यांना शांत राहू द्या. माझ्यावर लावलेला या आरोपावर मला तर विश्वास होत नाही’.

सुशांतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील अनेक जण ट्रोल होत आहेत. ज्यामध्ये करण जोहरचे नाव सर्वात वर आहे. अभिनेत्री कंगना रणावतने सुशांतच्या आत्महत्येचे नियोजित खून म्हणून वर्णन केले आहे. कंगनाने पुन्हा व्हिडीओ पोस्ट करुन सेलेब्रिटींना फटकारले आणि परिवार वादाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा