मुंबई, ५ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्रात सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस राजकीय रंग चढताना दिसतोय. तर भाजप हे या विषयी सरकारला सारखेच धारेवर धरताना दिसत आहे. त्यातच भाजपचे खासदार नारायण राणे एक असं नाव ज्यांना सध्या कुणीही विचारत नसले तरी काही ना काही विधान करुन ते मिडीयात कायम चर्चेत राहतात. सध्या त्यांनी देखील सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणात उडी घेत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे आता एकच खळबळ माजली आहे.
नारायण राणे यांनी बाॅलिवुड आभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या मैनेजर बद्दल एक खळबळजनक आरोप केला. ज्या मधे “सुशांतच्या मैनेजर ने आत्महत्या केली नसून तिचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे, तिच्या गुप्तांगावर जखमा होत्या” असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
तर राणे हे एवढ्यावरच न थांबता “सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे, कोणा युवा मंत्रीला(त्यांचा रोष हा आदित्य ठाकरे याांच्यावरच होता) वाचवण्याचा प्रयत्न करत आहे”असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. तर पुढे त्यांनी महाराष्ट्रात या प्रकरणावर अजून FIR का दाखल झाली नाही हा प्रश्न उपस्थित केला आहे.
शिवसेनेकडून नारायण राणेंना प्रतिउत्तर….
तर या सर्व प्रकरणावर शिवसेनेकडून देखील उत्तर देण्यात आले. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट पणे सांगितले की, तपास हा योग्य पद्धतीने चालला असून ज्यांच्या कडे पुरावे आहेत त्यांनी पोलिसांना द्यावे, उगाच आरोप करत बसू नये, असे सांगितले.
यावर मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक पत्रक काढले आहे.”हे तर गलिच्छ राजकारण मी तर संयम बाळगलाय”असे त्याचा मथळा असून त्यांनी आपली बाजू मांडली आहे. तर खाली दिलेल्या परिपत्रकात ती सविस्तर आहे.
तर राणे होत आहेत ट्रोल…..
नारायण राणे यांच्या वक्तव्यावंर सोशल मिडीयातून पुन्हा एकदा त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी