सुशिक्षित व सुसंस्कृत चोर

वेळ रात्री एक वाजून तीस मिनीटांची, गाडी मिरज स्थानकात येऊन थांबली व मी झोपेतून जागा झालो वरती सामान ठेवण्याच्या जाळीत चाचपून पाहिले तर माझी बॅग नव्हती, बॅग गायब ! मी लगेच कंडक्टरला सांगितलं अहो कंडक्टर माझी बॅग नाही हो ! कंडक्टर :- नीट बघा तिथं असेल कुठेतरी कंडक्टर असे म्हटल्यावर मी नीट पाहिले तर या कडेपासून त्या कडेपर्यंत कुठेच बॅग नव्हती. कारण मी सीटवर चढून पाहिले मला वाटले कदाचित दुसऱ्या बाजूला असेल म्हणून मी त्याही बाजूला वरती चढून पाहिले तर बॅगच नाही. हे बघेपर्यंत कंडक्टर ड्रायव्हर खाली उतरून डेपो मध्ये गेले होते. कारण गाडीला पंधरा मिनिटांचा हॉल्ट होता. मी खाली आलो, मलाही लघुशंकेला जाऊन यावे वाटले कारण पुढच्या पंढरपूर पर्यंतचा प्रवास तीन तासांचा होता, मी जाऊन आलो पुन्हा माझ्या जागेवर कावरेबावरे होऊन बसलो. काही प्रवासी खाली गेले होते तर काही खालून वरती येत होते मी जवळजवळ प्रत्येकालाच विचारत होतो पण मला कोणीच त्याबाबतीत सांगत नव्हते.
थोड्या वेळातच ड्रायव्हर गाडीत चढला व नंतर लगेच कंडक्टर गाडीत आला.
मी :- ” कंडक्टर आता कसे करायचे”
कंडक्टर :- “तुम्ही कुठून आलात गाडीत”
मी :- “अहो मी कोल्हापूरतुनच या गाडीत बसलो आहे”
कंडक्टर:- कुठे निघालात?
मी:-” मला पंढरपूरला जायचे आहे”
कंडक्टर :- “बॅग नाही हे तुम्ही केव्हा पाहिले ?”
मी:- ” हे काय आत्ताच इथेच मगाशी नाही का तुम्हाला सांगितले गाडी थांबल्या थांबल्या.”
कंडक्टर:-” मग तुम्ही आता कसं सांगितलं यापूर्वी का नाही सांगलीत चांगली गाडी थांबली होती तिथे का नाही पाहिलं”
मी:-” कंडक्टर अहो मी झोपी गेलो होतो, मला आत्ताच जाग आली ते मिरज स्टँड वर.”
कंडक्टर:- “बरं तुम्ही असे करा येथेच उत्तरा दुसऱ्या गाडीने तुम्ही परत सांगली ला जा वं तिथे पोलिस कंप्लेंट करा बॅग मिळून जाईल कारण तुमची बॅग सांगलीत गेली कोल्हापूर सोडल्यावर गाडी फक्त सांगली स्टँड थांबली होती”

मी विचार केला परत सांगलीला जायचे पोलिस कंप्लेंट करायची व तिथेच रडत बसायचे पोलीस कशी मदत करतात हे सर्वश्रुत असल्याने व चार लोकांचे अनुभव ऐकल्याने मी विचार केला, त्याला आपल्या घरी थेट माळशिरस ला नाहीतरी बॅगेत असे काय सामान होते टॉवेल, अंडरवेअर, एक जुडे बनियन आणि आतल्या कप्प्यात माझे दुचाकीचे परमनंट लायसन. माझे आय कार्ड वगैरे चला डुबलीकेट काढू म्हणून मी बसायला लागलो इतक्यात आहे काय करता तुम्ही उत्तर काय काय पुढे येत आहे गाडीला उशीर होतोय गाडी तुमच्यासाठी थांबली आहे आहे असा आवाज आवाज ऐकला गप गुमान खाली मान घालून बसलो म्हणालो चला ! गाडी हल्ली जशी पुढे जावू लागली तसतसे माझे मन विचारांनी अधिकच भरून गेले. माझा सहप्रवासी पंढरपूरला उतरणारा होता त्याला पण मी सर्व गोष्ट इत्यंभूत सांगितले तर तो म्हणाला त्यात काय महत्वाचे कागदपत्र नव्हते. जे गेले ते डुबलीकेट काढता येईल थोडा खर्च होईल पण काढता येतात. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जर पोलिसांकडे परत गेला असता तर पोलिसांनी बॅग तर शोधलीच नसती, पण उगाच तुम्हालाच त्रास दिला असता व तुम्हाला नसता मनस्ताप झाला असता. अशा गोष्टींचे काही खरे नाही आता ती गोष्ट घरी जाईपर्यंतविसर आणि निवांत बसा असा शेरात्मक उपदेश प्रवाशांकडून झाल्यावर मी शांतपणे बसलो मनातल्या मनात कृष्णार्पण म्हणालो, व नाव घेत राहिलो पुन्हा कधी झोप लागली हे कळलेच नाही गाडी थांबली होती व कंडक्टर चला पंढरपूर वाले खाली उतरा पंढरपूर आले आहे असे म्हणाला, ताबडतोब जाग आली व मध्ये सांगोला गेले तरी आपणास कशी काय जाग आली नाही याचा खेद वाटला.

झटकन खाली उतरलो पहाटेचे पाच वाजले होते पुन्हा एकदा चांगला जागा झालो व लघुशंकेला जाऊन आलो. परत स्टॅन्ड मध्ये पुणे मार्गाच्या प्लॅटफॉर्मवर येवून बसलो कारण साडेपाच वाजता पंढरपूर- पुणे गाडी होती त्या गाडीने मी माळशिरस येथे जाणार होतो. बरोबर एक तासात केवळ 50 कि.मी अंतर पार करून गाडी माळशिरस ला येणार होती. अगदी त्याप्रमाणे सर्व झाले. पण माझ्या मनामध्ये विचारांचे चक्र पुन्हा एकदा सुरू झाले, हे असे कसे झाले? आतापर्यंत आपण इतका प्रवास केला त्यामध्ये असे कधीच नाही व आता कसे? इत्यादी प्रश्नांनी मनात विचारांचे काहूर माजवले होते व त्यातूनच आता सौ.ना काय सांगायचे हा प्रश्न आला.
गाडी स्टँडवर अली व थांबली

क्रमश ;

श्री नागनाथ राऊत सर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा