बागपत मधील निलंबित पोलीस उपनिरीक्षकाने कापली दाढी, कामावर पुन्हा रुजू

बागपत (उत्तर प्रदेश), २५ ऑक्टोंबर २०२०: उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाला दाढी वाढवली कारणाने निलंबित करण्यात आले होते. पोलीस प्रशासनात लांब दाढी ठेवण्यावर बाबंदी आहे. केवळ सिख समुदायातील कर्मचाऱ्यांना दाढी वाढवण्याची मुभा देण्यात आली आहे. तथापि, आता उपनिरीक्षकाने दाढी काढली असून, त्यानंतर त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले.

हे संपूर्ण प्रकरण बागपतच्या रामला पोलिस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक इंतेशर अली आणि त्याच्या लांब दाढीशी संबंधित आहे. बागपतच्या पोलिस अधीक्षकांनी उपनिरीक्षकाला आपली दाढी तीनदा कापण्याचा इशारा दिला होता, परंतु तरीही तो मोठ्या दाढीमध्ये कर्तव्य बजावत राहिला. या कारणास्तव बागपतच्या एसपींनी त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आणि पोलिस लाइनमध्ये पाठविले.

तथापि, आता इंतेशर अली दाढी करून एसपीसमोर हजर झाले. त्यानंतर इंतेशर अली यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षकावर ही विभागीय कारवाई केवळ पोलिस नियमावलीनुसारच केल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या मॅन्युअल व नियमांनुसार, शिख वगळता कोणालाही वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय दाढी वाढवण्याची मुभा नाही. पोलिस विभागाचे कर्मचारी परवानगीशिवाय मिशा ठेवू शकतात परंतु दाढी वाढवण्यावर बंधन आहे. बंधन असले तरी ही मुभा देण्यात आली आहे की, सिख समुदाय व्यतिरिक्त इतर धर्मातील लोकदेखील दाढी वाढू शकतात. परंतु, त्याआधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा