पंतप्रधानांच्या निवासस्थानावर दिसले संशयास्पद ड्रोन, पोलिसांकडून तपास सुरू

17

नवी दिल्ली, ३ जुलै २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास संशयास्पद ड्रोन उडताना दिसले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या ‘एसपीजी’ने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थान ‘नो फ्लाइंग झोन’ अंतर्गत येते. अशा स्थितीत नो फ्लाइंग झोनमध्ये ड्रोन कोण उडवत होते, हे ड्रोन या भागात कसे पोहोचले. याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही.

दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आजूबाजूच्या भागात कसून शोध घेण्यात आला, परंतु अशी कोणतीही वस्तू आढळली नाही. एअर ट्रँफिक कंट्रोल रुमशी देखील संपर्क साधण्यात आला, परंतु पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ अशी कोणतीही उडणारी वस्तू आढळली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर