कळंब शहराच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांना कोरोनाची लागण.

उस्मानाबाद, ६ ऑगस्ट २०२० :कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर रूग्णांची संख्या अधीकच वाढत जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भावामुळे ३ ऑगस्ट पासून ते ९ ऑगस्ट पर्यंत कळंब मध्ये कर्फ्यू लागू केलेला आहे. आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी कळंब शहराच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांना देखील कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

सर्दी असल्याने दोन दिवस वेगळे राहिलोत. मात्र, आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी रॅपिड कीट वर कोरोना तपासणी केली आणि त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. आपण कोरोना बाधीत झाल्याचे समजताच, आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी केले. त्यांच्यासोबतच, त्यांचे पती सागर मुंडे आणि उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

कोरोना च्या या महामारी च्या काळात, सर्वांनी आपली काळजी घ्यावी तसेच मागील दिवसांत आमच्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केलेले आहे. नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, त्यांचे पती सागर मुंडे तसेच उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांचा मागील दिवसांत अनेक नगरसेवक, शहरातील प्रमुख व्यक्ती, अधिकारी, तसेच अनेक नागरिकांशी देखील संपर्क झाला असेल, या कारणामुळे कळंब शहरात सध्या चिंताजनक तसेच गंभीर वातावरण निर्माण झालेले आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा