स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन गाढवाला दुग्धाभिषेक करत भिमानगर येथे रास्ता रोको आंदोलन

माढा, सोलापूर १५ ऑक्टोबर २०२३ : दूध दर कपातीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीमानगर (ता. माढा) येथे रास्ता रोको आंदोलन करत गाढवाला दुग्धाभिषेक करून निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फॅट ३:५ व एसएनएफ ८:५ असणाऱ्या दुधाला ४० रुपये प्रति लिटर दूध दर देण्याची मागणी केली. शासनाने गेल्या वर्षीच्या साखरेचा कमीत कमी दर ३१०० रु. गृहीत धरून एफआरपी ठरवण्यात आली होती. त्याप्रमाणे गेल्या वर्षी गळीत हंगामातील ऊसाला, ४०० रुपये अधिक दर देण्यात यावा अशी मागणी आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेने केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाढवाला दुग्ध अभिषेक घालून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी गाढव सुध्दा प्रामाणिक आहे, जर ते मंञी असते तर शेतकरी वर्गची हि अवस्था पाहून लगेच न्याय दिला असता असे मत जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले

यावेळी स्वाभिमानी जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील, स्वाभिमानी संघटना जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष प्रताप पिसाळ, जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे, सुरेश पाटील, बाळासाहेब पाटील, ॲड.रणजित बाबर, प्रशांत उंबरे, संतोष पाटील, भारत गायकवाड,निलेश मेटे, नानासाहेब मेटे, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पाणबुडे,आबा तनपुरे, सोमनाथ तनपुरे, शाहीर गोफने, दादासाहेब कळसाईत, बापू कोकाटे, सुग्रीव भोसले, अजित घाडगे, नवनाथ कुंभार, सुरेश गोरे,राजेंद्र बनसोडे, बापू गलांडे, नागभाऊ वीरकर, लक्ष्मण वाघमोडे, शंकर उबाळे,स्वप्नील कुलते आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व दुध व्यवसायीक उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिलारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा