ग्रामपंचायतींमध्ये नियुक्ती करत असलेल्या स्वच्छाग्रहीला ‘संत गाडगे बाबा स्वच्छता दुत’ नाव

लोणी काळभोर, ३ जानेवारी २०२१: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे व विविध विषयांच्या अनुषंगाने दूतांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येईल,
यामध्ये १. ज्योती दूत २. जल दुत ३. सावित्री दूत महिला सक्षमीकरण करणे ४. संत गाडगेबाबा स्वच्छता दूत स्वछता आणि व्यसन मुक्ती दूत असे विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

यामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता दूत नाव समाविष्ट करण्यासाठी परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था भारतचे संचालक चेतन नागोराव शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच गाव पातळीवर स्वच्छता रहावी याकरिता राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता दूत ची नियुक्ती आपल्या विभागामार्फत करण्यात येत असून त्यांची कार्य पद्धती निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत कळविण्यात आलेली आहे.

यावेळी शिंदे यांनी सदर विभागाला विनंती केली होती की, सदर योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता उपरोक्त विषयाचा विचार होणे गरजेचे आहे. सदर योजना हि स्वच्छतेचा मुलमंत्र देणारे संत गाडगे बाबा यांच्या आचार व विचारावर अवलंबून आहे. संत गाडगे बाबा यांनी गावा-गावात जाऊन स्वच्छता कशी करायची ती करून तेथील सर्वसाधारण वर्गाला शिकवून स्वच्छतेचा मूलमंत्र दिला.

तसेच आजही जर कुणी संत गाडगे बाबा यांचे नाव उच्चारले तरी स्वच्छता या शब्दाची आठवण होते, म्हणून सदस्योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्याकरिता व ती ग्रामीण भागातील अशिक्षित ते उच्चशिक्षित वर्गाला सहज समजते या करिता सदर योजनेचे स्वच्छाग्रहीं नाव बदलुन “ संत गाडगे बाबा स्वच्छता दूत ” देण्यात यावी अशी मागणी शिंदे यांनी केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा