स्वयंघोषित गुरू नित्यानंदचे देशाबाहेर पलायन

20

गुजरात : गुजरात पोलिसांच्या रडारवर आलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू स्वामी नित्यानंद याने देशाबाहेर पलायन केल्याची माहिती पुढे आली आहे. नित्यानंदच्या येथील आश्रमात ताब्यात ठेवण्यात आलेल्या लहान मुला-मुलींचा छळ होत असल्याचा आरोप आहे. त्यावरून वादग्रस्त नित्यानंदकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

आश्रम चालवण्यासाठी अनुयायांकडून देणग्या लाटण्यासाठी qलहान मुला-मुलींचा गैरवापर केला जात असल्याच्या आरोपावरून नुकताच नित्यानंद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आश्रमाच्या दोन व्यवस्थापिकांना अटक करण्यात आली. आता नित्यानंदला ताब्यात घेण्यासाठी हालचाली केल्या जाणार आहेत.

त्याच्याविरोधात काही वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तो भारताबाहेर पसार झाला. त्यामुळे त्याला परदेशातून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूतोवाच गुजरात पोलिसांनी केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा