गोल पोस्ट राष्ट्रीय स्वामी अग्निवेश यांचं दिल्लीमध्ये निधन

स्वामी अग्निवेश यांचं दिल्लीमध्ये निधन

नवी दिल्ली, दि. ११ सप्टेंबर २०२०: सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं दिल्लीमधील रुग्णालयात निधन झालं आहे.
स्वामी अग्नवेश हे लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना दिल्लीमधील आयएसबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. अखेर संध्याकाळी ६ वाजून ४५ वाजता डॉ. शिव सरीन यांनी अग्निवेश यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं.

त्यांचं पार्थिव सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी दिल्लीतील जंतरमंतर रोडवरील कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर उद्या (शनिवारी) संध्याकाळी ४ वाजता गुरुग्राम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील असं बंधुआ मुक्ती मोर्चा आणि सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेचे कार्यवाह स्वामी आर्यवेश यांनी सांगितलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version