जानेवारीमध्ये अयोध्येत ‘श्रीरामांच्या’ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची घोषणा

पुणे १९ जून २०२३: अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असून, येत्या जानेवरीच्या तिसऱ्या आठवड्यात ‘श्रीरामांच्या’ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची घोषणा, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज, यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात केली.

अयोध्येतील राममंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर, दुसऱ्या दिवसापासून सर्वसामान्यांना श्रीरामांचे दर्शन घेता येणार असून, देशभरातून विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही गोविंददेवगिरी महाराज यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

निवडक साधुसंत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याने त्यादिवशी सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश नसेल, परंतु प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवसापासून सर्वसामान्यांना श्रीरामांचे दर्शन घेता येणार आहे. श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर सर्वांनी अयोध्येला यावे आणि दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे, असे आवाहनही स्वामीजींनी केले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा