नांदेड, दि.१९ मे २०२० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न सर्व महाविद्यालयाचे सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज दि. ३१ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठ परिसर आणि उपपरिसर येथील संचालक आणि प्रशासकीय विभागप्रमुख यांच्यासह वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकारी यांनी कामकाजाच्या निकडीनुसार कार्यालयात उपस्थित राहावे. तसेच आपल्या अधिनस्त वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार रोटेशन पद्धतीने कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असेल, असे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या निर्देशनुसार कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे.
विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, सर्व संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीआपल्या घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज पूर्ण करावे. असे स्पष्ट करण्यात आले आहे.
न्युज अन कट प्रतिनिधी