स्वराज्याचे घोडदळ

यात दोन प्रकार असत. एक ‘बारगीर’ आणि ‘शिलेदार’. बारगीर म्हणजे सरकारी घोडेस्वार. यास सर्व सामान शिवाजी महाराजांतर्फे दिले जाई. शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा व आवश्यक सामान आहे तो.

//सनोबतस्तु सेनानी ://

अशी समर्पक व्याख्या देत राज्यव्यवहारकोशात सरनोबताचे वर्णन आले आहे. सरनोबत ही शिवकाळातील अत्यंत मोठी आसामी.
घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखंची नियुक्ती होत असे. दोन्ही विभागांचा कारभार हा
स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे
रचत.

हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे पागा व्यवस्था थोडक्यात अशी होत

सरकारातून घोडा मिळणारा बारगीर > २५ बारगिरास १ पखालजी १ नालबंद व १ हवालदार
५ हवालदारांचा मिळून १ जुमलेदार (पगार ५०० होन सालाना व पालखीचा मान)
१० जुमलेदारोंच्यावर १ हजारी (सालाना पगार १००० होन)
५ हजारींच्यावर १ पंचहजारी आणि या पंचहजारींच्या वर असणारा सरनोबत अंदाजे या सैन्य सरनौबतास सालाना ४००० ते ५०००
होन इतका पगार होता.

शिवकालात सरनोबत कोण होते आणि कधी होते हे

सरनौबताचे नाव, नियुक्ती काल व सैन्य प्रकार
तुकोजी चोर १६४०-१६४१ दरम्यान
नुरखान बेग १६४३ पायदळ
माणकोजी दहातोडे १६५४ घोडदळ
येसाजी कक १६५८ पायदळ
नेतोजी पालकर १६५८ घोडदळ
कडतोजी प्रतापराव गुजर १६६६ घोडदळ
हंसाजी हंबीरराव मोहिते १८ एप्रित १६७४ घोड़दळ.

यादी शिवकालातील सरनौबतांची.

तुकोजी चोर ह्यंना सरनोबत केल्याचा उत्लेख फक्त सभासद बखरीत आणि एका पत्रामध्ये आहे. शिवाजीराजचे जे मावळातील बालपणीचे मित्र त्यातील हे एक असावे ह्या व्यतिरिक्त ह्याचा उल्लेख सुभानमंगळच्या लढाई संबंधी शिवभारतात येती. तुकोजी सोबत एक भैरोजी चोर असेही नाव येते. तुकोजी नेमके पायदळाचे सेनापती होते की घोडदळचे हे मात्र माहितीव्या अभावे संगिता येत नाही. श्री शेजवतकर यांच्या अंदाजे तुकोजी यांचा मृत्यू १६५७ च्या जुन्नर लुटीच्या वेळी झाला तोवर तुकोजी है सरनोबत होते परंतु त्यांनी कोणताही आधार दिला नाही. नुरखान बेग ह्याचे नाव पुण्यात १६५७ साली झालेल्या एका निवाडपत्रात पायदळाचा सरनौबत म्हणून येते. शहाजीराजांनी शिवाजीराजांसोबत जी माणसे पाठवली त्यात हा असावा. ह्या पत्राच्या आधी किंवा नंतर याचा काहीही सुगावा लागत नाही पण १६५७ नंतर मात्र लगेचच त्यांना सरनौबतीवरून दूर करून त्याजागी येसाजी कंक ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

येसाजी कंक राजगड नजीकच्या भुतोडे गावचे सर पाटील असणारे येसाजी कंक म्हणजे शिवाजीराजांचे बाल सवंगडी. ह्या सवंगड्याने आपल्या जीवासशी वेळोवेळी अगदी अखेरपर्यंत स्वराज्याची साथ दिली, जवळ जवळ ३० वर्षे येसाजी पायदळाचे सरनौबत होते.अफजल प्रकरण, ७० चा वादळी पराक्रम, भागानगर भेट इस्यादी ठिकाणी ह्यांचे भरपूर उल्लेख आहेत. हांचे पुत्र कृष्णाजी कंक हे शंभूकालात फोंड्याच्या लढाईत गोळा लागून पडले.ह्यांच्या सोबत एक कोंडाजी कंक असेही नाव येते. 

नेतोजी पालकर यांचा उल्लेख आजवर इतिहासात नेताजी असा लिहिला गेला पण ते चूक आहे. समकालीन साधानाप्रमाणे नेतोजी हवे. ह्यांना १६५७ च्या सुमारास माणकोजी नंतर पागेची सरनोबाती मिळाली. दिग्विजयी पराक्रम करीत त्यांनी प्रती शिवाजीचीच उपमा मिळवली.पण स्वराज्याच्या कडक नियमात न बसणाऱया हलगर्जीपणामुळे त्यांना शिवाजीराजांनी

“समयास कैसे पावला नाहीत ?”

असा कौल लावीत दूर केले.हे मग अगोदर आदिलशाहित व तेथून मिर्जा राजाशी संधान बांधून मोगलाईत गेले व परत येवून शिखर शिंगणापूरला शुद्ध झाले परंतु शिवाजीराजूच्या मृत्यु पश्चात शहजादा अकबर प्रकरणानंतर केव्हातरी
पुन्हा हे मोगलाईत गेले.

 

कडतोजी प्रतापराव गुजर ह्यांच्या नेमणुकीच्या बऱ्याच आख्यायिका आहेत. मिर्जा राजा जयसिंगावर छुपा हल्ला, मोगल: सेनापतीची हायांनी व शिवाजीराजांनी केलेली एकाच वेळची लूट इत्यादी पण विश्वसनीय पुराव्या आधारे ह्यांना सरनौबाती आणि प्रतापराव किताब १६६६ मध्ये मिळाला तसेच दिग्विजयी पराक्रम करीत त्यांनी तो सार्थ ठरवला. बागलाण, औरंगाबाद स्वारी आणि इतर अनेक पराक्रम यांच्या वाटचे आहे.१६७४ मध्ये राज्याभिषेकाच्या काही काल आधी बहलोल खान सोडल्या प्रकारणी शिवाजी महाराजांनी त्यांना

सला काय नि्मित्य केलात ?

असा करडा सवाल केला आणि

बहलीलखानास गर्दास मेळवून मगचे
रायगडी आम्हास तोंड दाखवणे

असा कड़क आदेश दिला आणि हाच राग मनी बाळगून महाशिवरात्रीच्या दिवशी प्रतापराव आपल्या ६ सरदारांना सोबत घेवून बहलोल खानवर तुटन पड़ले आणि वीरगतीस प्रात झाले.

हंसाजी हंबीरराव मोहिते हुंबीरराव माणूस तसा रंगडा परेतु स्थिर बद्धीचा. शंभूकातात जी मोगली वावटळ उठली त्यात
सगळ्यात महत्वाची कामगिरी कुणी केली असेल तर ती हंबीरराव मोहित्यांनी, प्रतापरावांच्या नंतर कुणास सरनोबती द्यावी या
विचाराने शिवाजी महाराज चिपळणला असवाचा जिपत्य फोजेचा कौल चेऊन आले आणि त्यांनी हंबीरराव यांना सरनौबत केले.
है शिवाजीराजांच्या अखेरपर्यंत घोड़दळचे सरनोबत होते हबीरराव मोहिते पुढे शंभूकाळात शर्जाखानाच्या लढाईत वाई इथे गोळा
लागून पडले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा