स्वरंग लॉकडाउन स्पर्धेमध्ये भाग घेताय ना ..

देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे आपण गेल्या दीड महिन्यापासून घरामध्ये लॉकडाऊन करून रहात आहोत. प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहोत. काही तरी नवीन करण्याची इच्छा असूनही बंदमुळे काही करणे शक्य नाही. मात्र यावर अगळी वेगळी स्पर्धा “स्वरंग” ही मराठी वाहिनी आपल्यासाठी घेऊन आली आहे….

या स्पर्धेचे तीन विभाग करण्यात आले आहेत. त्यात नृत्य, शॉर्ट व्हिडीओ, आणि आपल्या कुटुंबियांसोबत काढलेला एक व्हिडीओ असे विभाग करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी तीन क्रमांक काढण्यात येणार असून त्यात प्रथम क्रमांकास ५०००, द्वितीय क्रमांकास ३०००, तृतीय क्रमांकास १०००. अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.

पहिला विभाग नृत्य : या विभागात सोलो, ड्यु (दोघे), वेस्टर्न (पाश्चिमात्य) या भागात विभागली गेली आहे. त्यात सोलोसाठी १.३० मी.चा व्हिडीओ, ड्यु साठी २.०० मी. चा व्हिडीओ, वेस्टर्नसाठी ३.००मी. चा व्हिडीओ.एवढ्या वेळेचे व्हिडीओ करून पाठवावे. त्यात हे व्हिडीओ कुठल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेले अथवा घेतलेले नसावे, तो तुमच्या घरातच शूट केलेला असावा, त्याचा आवाज स्पष्ट असावा, टिक टॉकचे व्हिडीओ स्वीकारले जाणार नाहीत, या व्हिडिओचे शुटिंग मोबाइल आडवा( लँडस्केप)मध्ये करून करावे, शूटिंग करतेवेळी आपल्या मध्ये योग्य अंतर ठेवणे गरजेचे आहे, व्हिडीओ बनवताना लॉक डाऊनचे योग्य पालन करणे गरजेचे आहे, हे व्हिडीओ येत्या १५ मे २०२० पर्यंत आमच्यापर्यंत पाठवणे गरजेचे आहे.(हे तिनही विभागासाठी लागू).

दुसरा विभाग म्हणजे शॉर्ट फिल्म: या विभागात स्पर्धकाने स्वतः तयार केलेला व्हिडीओ पाठवणे गरजेचे आहे, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुठल्याही वयाचे बंधन नाही, प्रौढांचे (adult) विषय वगळता इतर विषय पाठवले तरी चालतील, शॉर्ट फिल्मचा कालावधी ५ मी.पेक्षा अधिक नको, यात मोबाईल, कॅमेरा अथवा तुमच्याकडे असणाऱ्या कुठल्याही कॅमेराद्वारे तुम्ही शूटिंग करू शकता, शूटिंग कॅमेरा लँडस्केप मोड ( मोबाइल आडवा) धरूनच करावे, ही फिल्म योग्य पद्धतीने एडिट केलेली असावी,एडिटमधील कोणत्याही भागाला कॉपयराईटचे बंधन असू नये, याशिवाय फक्त निवड केल्या गेलेल्या फिल्मस् “स्वरंग” वर प्रक्षेपित केल्या जातील, फिल्म बनवताना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे.

तिसरा विभाग म्हणजे “घरात सारे खेळूया” या विभागात तुमच्या कुटुंबियांसोबत खेळाचे मजेदार व्हिडीओज् बनवा. या विभागामध्ये टिक टॉक व्हिडीओज् , नृत्य अथवा शॉर्ट फिल्म स्वीकारल्या जाणार नाहीत, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुठल्याही वयाचे बंधन नाही, प्रौढांचे (adult) व्हिडीओ वगळता इतर कोणतेही व्हिडीओज् चालतील, व्हिडिओज् चा कालावधी ३.००मी.पेक्षा अधिक नसावा, मोबाईल, डीएसएलआर कॅमेऱ्याद्वारे शूटिंग करू शकता, शूटिंग करताना मोबाईल आडवा ( लँडस्केप मोड)मध्ये पकडावा, व्हिडीओ योग्य पद्धतीने एडिट केलेला असावा, व्हिडीओ येत्या १५ मे २०२० पर्यंत पाठवणे गरजेचे आहे, व्हिडीओ काढताना लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

हे व्हिडीओ खाली दिलेल्या संकेतस्थळावर talent@swarang.tv अथवा ९३५६८९७४७९ या व्हाट्स अप क्रमांक अथवा टेलिग्रामवर पाठवावे..

चला तर मग सहभागी होऊ या अनोख्या नृत्य स्पर्धेत..घरबसल्या करू या कुटुंबासोबत मनोरंजन..

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा