सातारा : थंडीच्या या वातावरणामध्ये साताऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी ‘स्वरंग’ मराठी वाहिनीने साताऱ्यामध्ये ‘सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन’ रेसचे आयोजन केले आहे. निसर्गाच्या सानिध्यात धावण्याचा अनुभव घेण्यासाठी शेकडो स्पर्धक आज साताऱ्यामध्ये उपस्थित राहिले आहेत.
‘स्वरंग’ वाहिनीने या मॅरेथॉन बरोबर इतर वेगवेगळे कार्यक्रम ही ठेवले आहेत. ‘स्वरंग’ मराठी वाहिनी जानेवारीमध्ये आपल्या भेटीस येत आहे त्यानिमित्ताने साताऱ्यामध्ये निसर्गप्रेमींसाठी आणि आरोग्य प्रेमींसाठी ही ‘सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. स्पर्धकांनी मोठ्या उत्सुकतेने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.
सकाळपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व सहभागी झाले आहेत. मनोरंजनाबरोबरच आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे आहे. हे या रेसच्या माध्यमातून ‘स्वरंग’ वाहिनीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मनोरंजन आणि आरोग्य यांचा अनोखा मेळ आज आपल्याला साताऱ्यामध्ये पहायला मिळाला आहे.