ती फलटणची बस आहे, चल मी घेऊन जातो; स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणी सोबत काय घडलं ?

22
Swargate News Swargate Bus Stop Pune Swargate bus stop Rape
ती फलटणची बस आहे, चल मी घेऊन जातो; स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणी सोबत काय घडल ?

Pune, Swargate २५ फेब्रुवारी २०२५ : ताई तुला कुठे जायच आहे अस विचारून तिच्याशी गोड बोलून ओळख करून घेतली आणि नंतर म्हणाला फलटणला जाण्यासाठी बस इथे नाही लागत. चल मी तुला घेऊन जातो असे बोलत तिच्यावर शिवशाही बसमध्ये नेहून बलात्कार केला. त्यामुळे आता या घटनेमुळे संपूर्ण पुणे हादरले आहे. ही घटना स्वारगेट बसस्थानकात घडली असून आरोपीची सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.


अशा घडलेल्या प्रकरणाबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. आरोपीने आधी तरुणीशी ओळख केली आणि नंतर तिला बसमध्ये नेऊन बलात्कार केला, असे स्वारगेट पोलिसांनी सांगितले.अत्याचार झालेली मुलगी मुळची फलटणची असून पुण्यामध्ये ती कामाला होती. आपल्या गावी म्हणजेच फलटणला ती चालली होती. याच दरम्यान सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली आहे. ती स्वारगेट बसस्थानकात बसची वाट पाहत होती. त्याचवेळी आरोपी तिच्या बाजूला गेला. आधी तो तिच्या आजूबाजूला फिरत होता असे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले.

सातरची बस इथे नाही लागत असे तरुणीला म्हणाला,

ताई तु कुठे चालली आहेस, असे आरोपीने तरुणीला विचारले. तेव्हा मुलगी म्हणाली मला फलटणला जायच आहे. तर आरोपी म्हणाला की, सातारची बस इथे नाही लागत. ती तिकडे लागली आहे.त्यावर मुलगी त्याला म्हणाली की, बस इथेच लागते, म्हणून मी इथेच बसली आहे. त्यावर आरोपी म्हणतो बस तिकडे लागली आहे. चल मी तुला घेऊन जातो. त्यानंतर मुलगी त्याच्यासोबत जाते आणि आरोपी तिच्यावर दरवाजा लाऊन अत्याचार करतो. अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा