स्वस्तधान्य दुकानदाराची महिलेस मारहाण

जालना, दि.३१ मे २०२०: कोरोना माहामारीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या लाॅकडाऊनमध्ये केंद्र शासनाने मजुर व गोरगरिबांसाठी मुबलक स्वस्त धान्य उपलब्ध करुन दिले असले तरी काही स्वस्तधान्य दुकानदारांच्या आडमुठेपणाचा गोर गरिबांना सामना करावा लागत असल्याचे चित्र जालना जिल्ह्यात पहायला मिळत आहे.

जालन्यातील नेर तांडा येथील स्वस्तधान्य दुकानदाराकडे एका महिलेने नियमानुसार धान्य देण्याची मागणी केली. त्यावर दुकानदाराने चिडून त्या संबंधीत महिलेस मारहाण करण्यापर्यंत स्वस्तधान्य दुकानदाराची मजल गेल्याने मौजपुरी पोलीस ठाण्यात याबाबत मारहाण झालेल्या महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना तालुक्यातील नेर तांडा येथे सिताराम दलसिंग पवार यांचे स्वस्तधान्य दुकान (क्र.१९२) आहे. नेर तांडा येथील एक महिला स्वस्तधान्य दुकानात धान्य आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या कुटुंबात सात सदस्यसंख्या असल्याने त्यांनी प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे ३५ धान्याची मागणी केली होती.

परंतु स्वस्तधान्य दुकानदाराने त्यांना फक्त १५ किलो धान्य दिल्याने त्यांनी जाब विचारल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या दुकानदाराने महिलेस वीट मारुन जखमी केले असे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा