पुणे, १६ ऑक्टोबर २०२२ : आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक २०२२ ला आजपासून सुरू होणार आहे. हा सामना श्रीलंका विरुद्ध नामीबिया यांच्यामध्ये गिलोंग येथे खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत जगभरातील १६ संघाचे स्टार खेळाडू आपला जलवा पसरवण्यासाठी सज्ज आहेत.
यंदा टी ट्वेंटी वर्ल्डकप दोन फेऱ्यांमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना आज श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात होणार आहे, तर भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध दुपारी दीड वाजता मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे.
ही स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत १६ संघ एकूण ४५ सामने खेळणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियातील सात वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत, तर स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.
या टी ट्वेंटी विश्वचषकाचे अधिकृत प्रसारण स्टार स्पोर्ट्स कडे आहे. त्याचबरोबर ओटीटीवर डिज्नी प्लस हॉस्टार वर टी-ट्वेंटी विश्वचषक २०२२ चे सर्व सामने आपण पाहू शकतो. हे सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ५:३०, सकाळी ८:३०, सकाळी ९:३०, दुपारी १२:३० आणि दुपारी १:३० अशा वेगवेगळ्या सामन्यांच्या वेळेनुसार आपण पाहू शकतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव