तारक मेहता का उलटा चश्मा शो मधील या कलाकाराने पुन्हा केले निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई ६ जून २०२३ : तारक मेहता का उलटा चश्मा भारतातील एक प्रसिध्द टेलिव्हिजन शो. दिर्घकाळ तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेने लोकांच्या मनात घर करून ठेवलं आहे. पण अलीकडील काळामध्ये अनेक जुन्या कलाकारांनी या शो ला राम राम ठोकला आहे. त्यानंतर शोच्या टीआरपी मध्ये देखील घसरांचा आहे त्याचे पाहायला मिळालं. तारक मेहता का उल्टा चश्मा मधील कलाकार या शोचा निरोप जरी घेत असले तरी वेगळ्या विषयाला तोंड फुटलं आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावरती अनेक कलाकारांनी गंभीर आरोप केले आहेत. ज्यामध्ये शोची जुनी रोशन भाभी अर्थात जेनिफर मिस्त्री बंसीवाल, बावरी म्हणजे मोनिका भौदरिया, तारक मेहता म्हणजे शैलेश लोढा यांचा समावेश आहे.

या शो मधील रोशन भाभी अर्थात जेनिफर मिस्त्री बंसीवाल यांनी असित कुमार मोदी यांच्यावर अश्लील वागणुकीचे गंभीर आरोप केले आहेत या आरोपावरच जेनिफर न थांबता शो मधील कलाकारांबद्दल गैरवर्तणूक केली जाते हे देखील सांगितले. निर्माता असित कुमार मोदी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत तसेच शो मध्ये काम करणारे काही कलाकार हे असित कुमार मोदी यांच्या बाजूने भूमिका मांडताना दिसतात.

या सर्व आरोपांमध्ये आता पुन्हा एकदा बावरीने असित कुमार मोदी यांच्यावरती आरोप केले आहेत. “तुझे किती बॉयफ्रेंड आहेत? तसेच ते माझ्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसत होते आणि वारंवार माझ्या डेटिंग आयुष्याबद्दल विचारत होते तसेच दारू पिण्यासाठी बळजबरी करत होते.” असे बावरीची भूमिका करणारी मोनिका भौदरिया यांनी एका मुलाखतीत असित कुमार मोदी यांच्यावर आरोप केले आहेत.

सर्वात लोकप्रिय म्हणून ओळखले जाणारे तारक मेहता का उल्टा चश्मा कार्यक्रम अशा अनेक गोष्टींमुळे आता प्रेक्षकांच्या मनातून उतरताना दिसत आहे. मुख्य कलाकार या कार्यक्रमात काम करत असले तरी अनेक मुख्य कलाकारांनी जसे की दया, रोशन सिंग सोडी, अंजली मेहता, टपू, सोनू यांनी शो सोडला आहे. तर नट्टू काका, डॉक्टर हाथी यांच्या निधन झाल्या मुळे त्यांचा जागी नविन कलाकार आले आहेत.

आता जे नवीन कलाकार तारक मेहता का उल्टा चश्मा शो मध्ये काम करत आहेत. एक कितपत प्रेक्षकांना मनोरंजन करण्यामध्ये यशस्वी ठरतील हे येणाऱ्या वेळेत कळेलच. पण त्याआधी इतर कलाकारांनी निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर लावलेला गंभीर आरोपांकडे असेच कुमार कशा पद्धतीने पाहतात आणि हे प्रकरण हाताळतात ते आपल्याला पुढे कळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा