पाकिस्तान : येथील अगडबंब शरीराच्या एक तरुण सध्या वधूच्या शोधामध्ये आहे. पाकिस्तानचा हा तरुण वेटलिफ्टर असून त्याचे नाव अरबाब खिजर त्याचे वय अवघे २७ वर्ष इतके आहे.
खान बाबा या नावानेही त्याची ओळख आहे. ‘हल्क’ला अति वजनामुळे वधू मिळणे अवघड झाले आहे. जोडा चांगला दिसावा अशी अपेक्षा असणाऱ्या खान बाबाने आतापर्यंत ३०० मुलींना रिजेक्ट केले असल्याची माहिती समोर येत आहे. वधूचे वजन किमान १०० किलो असावे अशी त्याची अपेक्षा आहे. जेणे करून आमचा जोडा छान दिसेल अशी बाबाची अपेक्षा आहे.
अरबाब हा खैबर पख्तूनख्वा जिल्ह्यातील मरदान येथील रहिवासी आहे. अगडबंब शरीर असणाऱ्या या तरुणाला आता लग्न करायचे आहे.
याबाबत बोलताना त्याने सांगितले आहे की, माझ्या वडिलांना असे वाटते की, आता मी विवाह करावा. परंतु आतापर्यंत एकही योग्य वधू मिळाली नाही. गेल्या सात वर्षांपासून आम्ही वधूचा शोध घेत आहोत. या दरम्यान २०० ते ३०० मुलींना बघितले आहे .मात्र, त्या मुलींचे वजन सामान्य असल्यामुळे मी त्यांना नकार दिला असे त्याने सांगितले.
लग्नाबाबत अरबाबच्या कुटुंबाची अपेक्षा आहे की, होणारी वधूची उंची सहा फूट चार इंच असावी. तसेच अरबाब हा सहा फूट सहा इंच उंच आहे. तसेच त्या मुलीला चांगले जेवण बनवता येणे गरजेचे आहे. अरबाब याचा रोजचा आहार प्रचंड असल्याने त्यांच्याकडून ही अट ठेवण्यात आली आहे. अरबाब रोज सकाळी नाश्ता करताना ३६ हुन अधिक अंडी खातो. तसेच दिवसभरात तो कमीत कमी चार कोंबडे फस्त करतो. यासह पाच लीटर दूध देखील पितो. असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.













































