तैवानने दाखविली लष्कराची ताकद, तिन्ही दलांसोबत केला युद्ध अभ्यास

तैचुंग (तैवान), दि. १६ जुलै २०२० : चीन सोबत सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणामध्ये तैवानने सुद्धा युध्द अभ्यास सुरू केला आहे. तैवानच्या थल सैन्य, जल सैन्य आणि हवाई दल या तिन्ही दलांनी प्रत्यक्ष फायरिंग करत आपल्या ताकदीचा अनुभव करून दिला. तैवानचे अध्यक्ष साई इंग वेन म्हणाले की आम्ही हे सांगू इच्छित आहोत की आमचा देश कमजोर नाही व चीन कडून तैवानमध्ये होत असलेल्या घुसखोरीला रोखण्यांमध्ये आम्ही सक्षम आहोत. जर चीनने गैर जबाबदारपणे वर्तन केल्यास आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ.

तैवानच्या युद्ध अभ्यासात तब्बल ८,००० सैनिकांनी सहभाग घेतला होता. यात हवाई दलाच्या एफ -१६ लढाऊ विमान आणि स्वदेशी लढाऊ जेट चिंग-कुओ यांनी आपली शक्ती दर्शविली. मध्य तैवानच्या किनारपट्टीवरील तैचुंग येथे या सैन्य अभ्यासामध्ये रणगाड्यांचा देखील गडगडाट एकण्यास आला. या कसरतीला हान-कुआंग असे नाव देण्यात आले. तैवान ही आपले लष्करी सामर्थ्य दाखवत आहे कारण कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीनने यावर्षी अनेक वेळा तैवानवर आपले लढाऊ विमान उडविले आहेत.

तैवान नौदलाने दक्षिण चीन समुद्राच्या किना-याजवळ क्षेपणास्त्र आणि मशीन गनसह लष्करी कसरती देखील केल्या. यावेळी, नौदलाच्या अनेक युद्धनौका समुद्रात दिसल्या. तैवानची काही बेटे त्यांच्या हद्दीत येतात असा चीनचा दावा आहे. तर तैवान म्हणतो की ही बेटे त्याच्या मालकीची आहेत. हान-कुआंग हा तैवानच्या सैन्याचा वार्षिक लष्करी अभ्यास आहे. यात, तैवानच्या तिन्ही सैन्याने आपले सामर्थ्य आणि अत्याधुनिक शस्त्रे दर्शविली आहेत.

यावर्षी जानेवारीत अध्यक्ष साई इंग वेन सत्तेवर आले. ते कधीच चीनपुढे नतमस्तक होणार नाही, असे ते आल्यावर म्हणाले. यानंतर त्यांनी दहा वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठे संरक्षण बजेट सादर केले. तैवान आर्मीकडे बहुतेक अमेरिकन शस्त्रे आहेत. यूएस आर्मी तैवानच्या सैनिकांनाही प्रशिक्षण देते. चीनकडे अधिक शस्त्रे आणि सैन्य असले तरी चीनच्या सामर्थ्याने तैवान कधीही भयभीत झाला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा