भारतातील चिनी दूतावासासमोर लागलं तैवानचं पोस्टर, चीनची भारताला चेतावणी

नवी दिल्ली, ११ ऑक्टोंबर २०२०: तैवानच्या ‘राष्ट्रीय दिन’ च्या निमित्तानं भारतातील चिनी दूतावासाबाहेर पोस्टर लावल्यानं चीन संतप्त झाला आहे. चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्स’नं असं म्हटलं आहे की, भारतीय जनता जे करत आहे ते आगीशी खेळण्यासारखं आहे आणि आधीच बिघडलेले भारत-चीन संबंध आणखी खालावतील.

वास्तविक पाहता नवी दिल्लीतील चिनी दूतावासाबाहेर तैवानच्या राष्ट्रीय दिनी अभिनंदनाचे पोस्टर लावले गेले. पोस्टरवर दिल्ली भाजपा नेते तेजिंदर पालसिंग बग्गा यांचंही नाव लिहिलं गेलं होतं. बग्गा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्टरचं छायाचित्र देखील ट्विट केलं आहे.

ग्लोबल टाईम्स’नं एका चिनी तज्ञाचा हवाला देत म्हटलं आहे की, ताइवानच्या राष्ट्रीय दिनाचे भारतीय माध्यमांनी पाठिंबा व समर्थान दर्शवलेल्या वेळी भाजपा नेत्यानं हे पाऊल उचललं आहे. दरम्यान, राष्ट्रीय दिनानिमित्त तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्सई इंग वेन यांनी चीनला शांततेचा संदेश देताना सांगितलं की, त्यांचा देश समान आधारावर अर्थपूर्ण चर्चेच्या बाजूनं आहे.

 

आतापर्यंत चीन तैवानला आपला अविभाज्य भाग मानतो. तैवाननं चीनची नेशन टू सिस्टम प्रणाली नाकारली. नुकतीच चीननं तैवानचा राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी भारताच्या वर्तमानपत्रात दिल्या जाणाऱ्या जाहिरातीबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि म्हटलं होतं की, वन चाइना पॉलिसी भारतानं ध्यानात ठेवायला हवी.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा