गोल पोस्ट राष्ट्रीय कर्जाचे सगळे पैसे घ्या, माझ्यावरील केस बंद करा : विजय माल्या

कर्जाचे सगळे पैसे घ्या, माझ्यावरील केस बंद करा : विजय माल्या

नवी दिल्ली, दि.१४ मे २०२०: भारतातील अनेक बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून ब्रिटनमध्ये फरार झालेला आणि मद्यसम्राट म्हणून ओळख असलेला विजय माल्या याने पुन्हा भारताकडे थकीत कर्ज जमा करून घेण्याची विनंती एका ट्विटरद्वारे केली आहे.

विजय माल्याने गुरुवारी ट्विट करत भारत सरकारकडे ही विनंती करत म्हटले आहे की, ” मी कर्जाची शंभर टक्के परतफेड करतो.असा माझा प्रस्ताव आहे.तरी माझा हा प्रस्ताव स्वीकारावा, आणि माझ्यावरील सर्व प्रकरणे बंद करावीत ” यात त्याने पुढे म्हटले आहे की, कृपया माझे पैसे विना अट घ्या आणि माझ्या विरुद्धच्या सर्व केस बंद करा’ असे त्याने स्पष्ट केले आहे. विजय माल्या हा २०१६ मध्ये भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पसार झाला होता. गेल्या महिन्यातही ब्रिटिश हायकोर्टाने विजय मल्ल्याचे भारत प्रत्यार्पणाविरूद्ध केलेले अपील नाकारले होते. काही दिवसांपूर्वीच माल्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचा निकाल येणे अजून बाकी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version