२२ जुलै २०२२ : केस हा सौंदर्याचा प्रमुख भाग मानला जातो. सध्याच्या काळात लांबसडक केस बघायला मिळणं अतिशय दुर्मिळ आहे. ताण-तणाव, ऋतु बदल, यांमुळे केसांचा पोत खराब होतो. केस गळणे, केस पातळ होणे, अशा समस्या सध्या वारंवार ऐकायला मिळतात. यामुळे आता केसांच्या तक्रारी वाढून डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेण्याची गरज निर्माण होत आहे. मात्र केसांची बेसिक काळजी घेतल्यास केस नक्कीच खराब होणार नाही.
यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…
१. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केस धुणे आवश्यक आहे. केसांना उत्तम प्रतीचा शाम्पू वापरणे गरजेचे आहे.
२. शाम्पू करताना तो थेट केसांना न लावता एका बाऊलमध्ये पाण्यात मिसळून मगच तो केसांना लावावा.
३. शाम्पू नंतर केसांना कंडिशनिंग करणे गरजेचे आहे.
४. बाहेर पडताना केसांना सिरम लावणे आवश्यक आहे. जेणे करुन केसांवर प्रदुषणामुळे धुळ किंवा तत्सम गोष्टींचा परिणाम होणार नाही.
५. सध्या बाजारात हेअरकलरचे मोठे फॅड आहे. शक्यतो हेअरकलर टाळावा. कारण त्यात असलेल्या केमिकल्समुळे केस खराब होतात. अन्यथा त्याची विशेष काळजी घ्यावी.
६. दोन महिन्यातून एकदा केस ट्रिम करावे. जेणेकरुन केसांची वाढ चांगली होते. केस कापल्यामुळे केसांची वाढ खुंटते हा गैरसमज आहे.
७. आठवड्यातून दोनदा केसांना कोमट तेलाने मसाज करावा. सध्याच्या पिढीला एकुणातच तेलाची अँलर्जी आहे, असे दिसून आले आहे.
८. तीन ते चार महिन्यात हेअर-स्पा जरुर करावा. त्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते.
९. सध्या बाजारात हेअरकेअरसाठी मेडिसीन उपलब्ध आहे. मात्र ड़क्टरांच्या सल्ल्याने या गोळ्या किंवा मेडिसीन घ्यावे
१०. केसांत उवा किंवा चाई अशा आजारांवर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
११. ई-व्हिटॅमिन हे कायम केसांसाठी उपयुक्त आहे. त्याच्या गोळ्या किंवा ते तेल कायम मसाजसाठी वापरावे.
या सर्व बेसिक गोष्टींची काळजी घेतल्यास नक्कीच तुमच्या केसांचे सौंदर्य खुलून दिसेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस