ह्रदयाची काळजी अशी घ्या……

पुणे, १८ डिसेंबर २०२०: या आधुनिक काळात मानवाची राहण्याची शैली बदलली ज्या मुळे त्याला अनेक आजारांनी ग्रस्त केले. डायबटीज, बीपी हे आजार तर आता सर्व सामान्य झाले आहेत. आज आपण आपल्या शरीरातील महत्वाच्या भागा विषयी अर्थात ह्रदया जाणून घेणार आहोत. आपले संपूर्ण आयुष्य हे ह्रदय निरोगी राहिले तरच व्यवस्थित चालते. आज आपण आपले ह्रदय कसे निरोगी ठेवता येईल त्यासाठी काय गरजेचे आहे. याबद्दल जाणून घेणार आहोत.

बेरी :-

बेरी हे अँटिऑक्सिडेंट पाॅलिफेनाॅलने समृद्ध आहेत. जे ह्रदयाच्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते. बेरी मधे फायबर, फोलेट आर्यन कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतात तसेच या मधे फॅट कमी प्रमाणात असते.

ओटमील :-

ओटमील तुम्हाला अनेक तास उर्जावान ठेवू शकतो. हा एक प्रकारचा लाभदायक नाश्ता आहे. यामुळे ब्लड शुगर पातळी खुप वेळ स्थिर ठेवण्यात मदत होते. हे मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर असून या ओट्समधे फायबर आसते, जे कोलेस्ट्रॉल कमी करून ह्रदयाला मदत करते.

नट्स :-

बदाम, हेझलटन, शेंगदाणे, पेकन्स, पिस्ता आणि अक्रोड हे ह्रदयासाठी खुप निरोगी आहेत. यामधे प्राॅटिन्स, फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन आणि आँटिऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात.

ब्रोकोली :-

ब्रोकोली व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे. तसेच यामधे भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. ह्रदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग रोखण्यात आणि ब्लडप्रेशरचा धोका कमी करण्यास ब्रोकोली मदत करते, असे संशोधकांचं सांगणं आहे.

सॅमन :- 

यामधे ओमेगा ३ फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात आसते. हे प्रभावीपणे ब्लड प्रेशर कमी करते. प्रत्येक आठवड्यात दोनदा घेतल्यास हृदयविकाराचा झटक्याने येणारे मृत्यू कमी होतात.

आपले ह्रदय शररीचा महत्वाचा भाग आहे. ते व्यवस्थित कार्य करण्यासाठी निरोगी गोष्टी ह्रदयापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही नियमीत निरोगी अहार निवडायला हवा. जो तुमच्या ह्रदयासाठी चांगले ठरेल.

तर असे मजबूत ठेवा ह्रदय…..

रोज व्यायाम करा

धुम्रपान सोडा

चरबी कमी करा, प्रामुख्याने वाढलेले पोट कमी करा

दारूचे प्रमाण मर्यादीत ठेवा

अतिप्रमाणात खाऊ नका

जास्त ताण घेऊ नका

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा