पावसाळ्यात त्वचेला सांभाळा.

पावसाळा आला की सगळ्यात जात काळजी घ्यावी लागते ती त्वचेची… पावसाच्या पाण्यात असलेल्या क्षारयुक्त पाण्यामुळे त्वचेला सर्वात जास्त इजा होते. त्वचेवर असलेले थर या पाण्यामुळे निघून जातात आणि त्वचा अतिशय कोरडी पडते. यासाठी पावसाळ्यात सर्वात जास्त त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते.
१. शक्यतो अंघोळ करताना साबणाचा वापर टाळा. साबणामध्ये जास्त अल्कलाईन असल्यामुळे त्वचा कोरडी होते. यासाठी अंघोळीसाठी डाळीचे पीठ आणि तांदळाचे पीठ दुधात मिक्स करुन लावावे. ज्यामुळे त्वचा मुलायम रहाते.
२. अंघोळीनंतर बाहेर पडण्याआधी मॉईश्चरायझर किंवा कुठल्याही प्रकारच्या क्रीमचा वापर करावा. जेणेकरुन त्वचा पावसाच्या किंवा उन्हाच्या थेट संपर्कात येणार नाही.
३. रेनकोट किंवा पावासाळी वस्त्रांमध्ये अँन्टीसेप्टीक पावडर टाकणे आवश्यक असते. अन्यथा थेट त्वचेला जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते.
४. पावसाळ्यातही उन्हाळ्याप्रमाणे संपूर्ण शरीर झाकणे आवश्यक असते. यासाठी सनकोट किंवा तत्सम गोष्टींचा वापर जास्त करावा.
५. पावासाळ्यात डोळ्यांच्यावरची त्वचा जास्त जपावी लागते. पावासाचे पाणी थेट डोळ्यात जाऊन डोळ्यांच्या बुभूळांना जास्त त्रास होऊन कालांतराने डोळ्यांची शक्ती कमी होऊ शकते. यासाठी डोळ्यावर चष्मा किंवा सनग्लासेस यांचा नक्की वापर करावा. रात्री झोपताना डोळ्यात नेत्रांजन किंवा यांसारखे तत्सम अंजन नक्की घाला.
६. बाहेरुन घरी गेल्यानंतर गरम पाण्यात मीठ घालून त्याने अंघोळ करा. जेणेकरुन जंतुसंसर्ग होणार नाही.
७. रात्री झोपताना हातापायावर व्हॅसलिनचा थर लावावा. त्याने त्वचेला पोषण मिळते. किंबहुना कोरफड जेल हा देखील उत्तम उपाय होय. सगळ्यात उपयुक्त म्हणजे खोबरेल तेल. जे सहज उपलब्ध असू शकते.
८. तळव्यांना तेल लावून मगच झोपावे. तळव्यांची त्वचा ही कडक असते. पण या त्वचेला पावसात जास्त त्रास होतो. खरुज किंवा चिखल्यांसारखे आजार या काळात उद्धभवतात. यासाठी पाय स्वच्छ धुऊन पायांच्या बोटांमध्ये अँन्टीसेप्टीक पावडर टाकणे, योग्य आहे.
९. अतिरिक्त मेकअपचा वापर टाळावा. तसेच अतिशय सौम्य फेसवॉश वापरावे, जेणेकरुन त्वचेची जळजळ होणार नाही.
१०. अतिरीक्त स्क्रबिंग टाळा. अन्यथा त्वचा लालसर होऊन त्वचेची आग होऊ शकते. त्याचबरोबर त्वचेवरचा नैसर्गिक थर निघून त्वचा सैल पडण्याची शक्यता असते.
पावासाळ्यात त्वचा सैल झाल्याने अकाली वृद्धत्वाची दाट शक्यता असते. यासाठी पावसाळ्यात त्वचेला जपा आणि सौंदर्य राखा…

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा