मोदींची विकास कामे घरोघरी पोहोचवा : शैलेश लाहोटी

लातूर, २४ एप्रिल २०२४ : भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ आज लातूर येथे भाजपाचे सरचिटणीस अ‍ॅड. दिग्विजय काथवटे यांच्या निवासस्थानी सुपर वॉरियसची बैठक पार पडली.

या बैठकीस मंडल अध्यक्ष प्रमोद गुडे, रवी सुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना लाहोटी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव जगभरात उंचावले आहे. त्यांनी देशातील सर्वसामान्य जनतेसह शेतकरी बांधवांसाठी विविध योजना आणल्या आहेत. विकास योजनांच्या माध्यमातून भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांनी लातूर जिल्ह्यासाठी कोट्यवधींचा निधी आणून विविध विकास कामे प्रत्येक गावापर्यंत पोहचवली आहेत. हीच विकास कामे घरोघरी पोहोचवून येणार्‍या निवडणूकीत मोदींचे हात बळकट करण्यासाठी खा. सुधाकर शृंगारे यांना मतदानरुपी आशीर्वाद द्यावे, असे आवाहन लाहोटी यांनी यावेळी बोलताना केले.

प्रत्येक वॉरियर्सने घरोघरी पोहोचून मोदी सरकारच्या काळात झालेली विकास कामे सांगितली पाहिजेत. लातूरच्या विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी परत एकदा खा. सुधाकर शृंगारे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी मिळून परिश्रम करण्याचे आवाहनही यावेळी लाहोटी यांनी केले.

तर अ‍ॅड. दिग्विजय काथवटे म्हणाले की, देशाला विकासाच्या पथावर कायम अग्रेसर ठेवण्यासाठी मोदींना तिसर्‍या वेळेस संसदेत पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व सुपर वॉरियर्सनी भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांना दुसर्‍यांदा मताधिक्याने निवडून देण्यासाठी परिश्रम घ्यावे. या बैठकीस मंडलातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा