नागपूर येथील सायकलपटू रेणू सिद्धूने पटकावला सुपर रेडोनियर्स सायकलीस्ट हा किताब

नागपूर, २४ एप्रिल २०२४ : नुकत्याच झालेल्या सायकल स्पर्धेत सायकलपटू रेणू सिद्धूने ६०० किमीचा प्रवास यशस्वी करून सायकलिंग स्पर्धेत सुपर रेडोनियर्स सायकलीस्ट हा किताब पटकावला आहे. त्यांनी ६०० किमीचे अंतर ३७ तास १९ मिनिटांत पूर्ण केले आहे.

ही स्पर्धा नागपूर फ्रीडम पार्क ते बैतुल पंखा आणि बैतुल पंखा ते नागपूर फ्रीडम पार्क आणि नागपूर फ्रीडम पार्क ते चंद्रपूर आणि चंद्रपूर ते नागपूर अशी होती. महत्त्वाचे म्हणजे न थांबता रेणू सिद्धू यांना यासाठी दिवसरात्र सायकल प्रवास करावा लागला. त्याच प्रमाणे ४०० किमीची स्पर्धा सिद्धू यांनी २६ तास ८ मिनिटांत पूर्ण केली. ३०० किमीची स्पर्धा १७ तास ४३ मिनिटांत पूर्ण केली. तर रात्रीची २०० किमीची सायकलिंग स्पर्धा फ्रीडम पार्क ते पिंपळे पाणी अशी पाऊस आणि वादळात सुरू झाली होती. पिंपळे पाणी येथून सुरू झालेली ही स्पर्धा नागपूर येथे पहाटे ४.३० वाजता समाप्त झाली.

या स्पर्धेत एकूण १७ सायकलपटुंनी सहभाग नोंदवला. ज्यात रेणू कौर सिद्धू या एकट्या महिला सायकल पटूचा समावेश होता.

न्यूज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा