जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजा सिंह व त्यांना आमंत्रित करणाऱ्या आयोजकांवर कडक कारवाई करा : ॲड. मुहम्मद अली शेख

14

लातूर, २३ फेब्रुवारी २०२३ : लातूर शहरात रविवारी (ता. १९) शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी हजेरी लावली होती. टी. राजा सिंह यांना चिथावणीखोर भाषण न करण्यासंदर्भात प्रशासनाकडून बजाविण्यात आले होते. तरीदेखील त्यांनी प्रशासनाच्या सूचना न जुमानता शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या मोटरसायकल रॅलीला संबोधित करताना प्रक्षोभक भाषण करून हिंदू-मुस्लिम एकतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरी लातूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजा सिंह व त्याला आमंत्रित करणाऱ्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘एमआयएम’चे लातूर जिल्हाध्यक्ष ॲड. मुहम्मद अली शेख यांनी केली आहे.

दरम्यान, लातूर हे शांतताप्रिय शहर आहे. येथे सर्व जातिधर्माचे लोक आपसांत प्रेमाने राहतात, देशात शिक्षणाचे माहेरघर म्हणून लातूरची ओळख आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाने बंदी घातली असतानाही जाणूनबुजून लातूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजा सिंह व त्याला आमंत्रित करणाऱ्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘एमआयएम’चे लातूर जिल्हाध्यक्ष ॲड. मुहम्मद अली शेख यांनी केली असून, सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

यावेळी ‘एमआयएम’चे लातूर शहराध्यक्ष मुजीब हमदुले, शहर कार्यकारी अध्यक्ष जावेद पटेल, शहर उपाध्यक्ष शेख सत्तार, शहर उपकार्यकारी अध्यक्ष सय्यद इनाम, शेख ताहेर, शेख जावेद, यासीनखान पठाण, अहमद खान पठाण, तौहिद मुजावर, सादिक मौलाना व अन्य उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा