ऑफिस मधून खोटी सीक लीव घेताय? तर सावध रहा, AI तुमच्या आवाजावरून तुमचे खोटे ओळखू शकते.

पुणे, १२ एप्रिल २०२३: तुम्ही पण आजारी असल्याच सांगून ऑफिसमधून खोटी सीक लीव घेता का ? बहुतेक लोक ऑफिसमधून सुट्टी घेण्यासाठी खोटी रजा घेतात. जेव्हा कर्मचाऱ्यांना कामातून ब्रेक घ्यायचा असतो तेव्हा बॉसची नाराजी टाळण्यासाठी अशी कारणे काढावी लागतात. मात्र आता तसे करणे शक्य होणार नाही. कारण हे शोधण्यासाठी, संशोधकांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकसित केली आहे जी तुमच्या आवाजाने तुमचे आरोग्य खराब आहे की नाही हे सांगेल. आजारपणाचे कारण सांगून ऑफिसमध्ये सुट्टी घेतली तर आता त्याचा फटका तुम्हाला सहन करावा लागू शकतो.

सुरतमधील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जर्मनीच्या युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सच्या संशोधकांनी आवाजाद्वारे रोग शोधण्याची पद्धत विकसित केली आहे. त्यानी केलेल्या अभ्यासामध्ये लोकांमध्ये सर्दी शोधण्यासाठी हार्मोनिक्सचा वापर करण्यात आला. या संशोधकांनी ६३० लोकांच्या आवाजाच्या अभ्यास केला. हे ६३० लोक असे सांगत होते की त्यांना सर्दी आणि खोकला आहे. परंतु, या संशोधनानंतर केवळ १११ लोकांना सर्दी झाली असल्याच आढळून आले. एखाद्या व्यक्तीला खरंच सर्दी झाली आहे की नाही हे ओळखण्यासाठी हे संशोधन केले गेले.

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचे नवीन मार्ग लोक शोधत आहेत आणि नवीन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रयोग केला जात आहे. हे नविन तंत्रज्ञान कर्मचार्यांसाठी मात्र त्रासदायक ठरू शकते, त्यामुळे ते पूर्णपणे निरोगी असताना आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेऊ शकत नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधि: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा