पुणे १६ जून २०२३: तळेगाव एमआयडीसीमधील ४५ मीटरचा तळेगाव-चाकण रस्ता एमआयडीसी मार्गे करण्याच्या मार्गातील अडथळा दूर होणार आहे. अशी माहिती उदयोजक रामदास काकडे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्त्याच्या कामासाठी जमीन देणारे शेतकरी, जिल्हाधिकारी तसेच प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, सुरेंद्र नवले, प्रांताधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये टप्पा क्रमांक १ ते २ चाकण-तळेगाव रस्ता एमआयडीसी मार्गे जोडणे आणि टप्पा क्रमांक १ ते ४ जनरल मोटर्स ते आंबळे एमआयडीसी रस्ता जोडण्याबाबत चर्चा झाली आहे.
यामध्ये शासनाकडून प्रतिएकरी एक कोटी, चार लाख रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शेतकऱ्यांनी प्रतिएकरी दोन कोटींची मागणी केली असल्याने, जिल्हाधिकारी यांनी दोन्ही प्रकरणे मंजूरीसाठी मंत्रालयामध्ये पाठवून, अर्जातील मागण्या मान्य करण्याबाबत पाठपुरावा करु असे सांगितले. शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळाला तर त्वरित जमिनी देऊ, अशी हमी शेतकऱ्यांच्या वतीने उदयोजक रामदास काकडे यांनी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर