तालिबान पाकिस्तानला पुरवतोय अमेरिकेची शस्त्रे!

मुंबई, २५ ऑगस्ट २०२१ : अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानचे आणखी एक कृत्य समोर आले आहे. तालिबान कोट्यवधी रुपयांचे अमेरिकन आर्मी आर्मर्ड दुसऱ्या देशाला विकत आहे. हा देश दुसरा कोणी नसून पाकिस्तान आहे. द मिरर मधील एका अहवालानुसार, तालिबान नेटवर्कद्वारे अफगाणिस्तानातून लाखो पौंड चोरलेले अमेरिकन लष्करी हार्डवेअर निर्यात केले जात आहेत. अमेरिकन लष्करी वाहनांच्या खुल्या आयातीला पाकिस्तानच्या आयएसआयने गुपचूप ग्रीन सिग्नल दिल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकन आर्मी आणि इतर बख्तरबंद लढाऊ वाहने अफगाणिस्तानातून पाकिस्तानला नेताना दिसली. काफिल्याच्या फोटोंमध्ये असे दिसत आहे की, अफगाण-तालिबान नेतृत्वाचे मुख्यालय मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानातील क्वेटा शहरात लष्करी ट्रक हलवले जात आहेत.

एका सूत्राने सांगितले की,” अमेरिकन सैन्य अफगाणिस्थान सोडून जाताना जी काही युद्धसामग्री मागे सोडून गेले होती ती संपूर्ण आता तालिबानच्या हातात लागले आहे “. त्यामुळे तालिबान कडे आता प्रचंड युद्धसामग्री जमा झाली आहे. आता हीच सर्व युद्धसामग्री तालिबान पाकिस्तानला पुरवत आहे.

कंदहारपासून पाकिस्तानमधील फ्रंटियर सिटी क्वेटा तीन तासांच्या अंतरावर आहे. हे दहशतवादी गट आणि अमली पदार्थांचा व्यापार विशेषतः हेरॉईनचे केंद्रस्थान आहे. या अहवालात असे सांगण्यात आले की, तालिबान पूर्वी पाकिस्तानच्या क्वेटा येथे आश्रय घेत आहे. गल्फ देणगीदारांकडून तालिबानला जास्तीत जास्त पैसा क्वेटाद्वारे पुरवला गेला आहे. जखमी तालिबान सैनिकांना येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे.

मिररने या आठवड्यात उघड केले की अमेरिकेने कोट्यवधी पौंड शस्त्रे आणि उपकरणे घेऊन अफगाणिस्तान कसे सोडले, त्यातील बरेचसे भाग आता तालिबानच्या हातात आहे. आणि तालिबान आता ते पाकिस्तानला विकत आहे. विशेष म्हणजे तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर जगाच्या नजरा अफगाणिस्तानवर आहेत. अशा परिस्थितीत तालिबानकडून पाकिस्तानला अमेरिकन शस्त्रे पुरवणे हे भारतासह इतर शेजारील देशांसाठी चांगले लक्षण नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा