गोल पोस्ट इतर राजकारण राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होण्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले

राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होण्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले

मुंबई,२८ नोव्हेंबर २०२२ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त व्हायचे असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी याचा खुलासा केला होता. त्यानंतर आज पुन्हा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version