गोल पोस्ट राष्ट्रीय तामिळनाडू: ५ वाहनांच्या धडकेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

तामिळनाडू: ५ वाहनांच्या धडकेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

कुड्डालोर, ३ जानेवारी २०२३ :तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर पहाटे सहा वाहनांची धडक झाली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1610113381381574656?s=19

याबाबत अधिक माहिती देताना कुड्डालोर पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी पहाटे त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर दोन खाजगी बस, दोन कार आणि ट्रकची आपापसात धडक झाल्याने हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांची ओळख अद्याप पटलेली नसून, अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version